मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच केली ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली.

या रस्त्यावर खड्डे पडल्याने तास न् तास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या महामार्गाची पाहणी केली. तसेच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सर्व ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ बुजविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे पोलीस उपायुक्त (वाहतूक)विनयकुमार राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading