आंतरशालेय वेट लिफ्टिंग स्पर्धेला खेळाडूंचा मोठा प्रतिसाद

ठाणे जिल्हा आंतर शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा पीपल्स एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरी, ठाणे येथे पार पडल्या. स्पर्धेला विक्रमी 151 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. विशेषतः ग्रामीण भागातून स्पर्धेसाठी उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर गौरव राव, वैज्ञानिक, डीआरडीओ यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेतून विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. ठाणे महानगरपालिका शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची मुंबई विभाग स्पर्धेकरिता निवड झाली.
17 वर्षे वयोगट – मुली वेदिका टोळे, यशश्री बेंडले, ग्रीष्मा थोरात, 17 वर्षे वयोगट मुले अथर्व आंब्रे, संजय गौडा, भविष्य मिश्रा, हर्षल बने, संकेत शिंदे, 19 वर्षे वयोगट मुली माही बाभुळकर, 19 वर्षे वयोगट मुले, समीर खान, मोहम्मद नंदगारकर, ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची मुंबई विभाग स्पर्धेकरिता निवड झाली 17 वर्षे वयोगट मुले मयुरेश भोईर, तनिष्क पाटील,अनुष लोखंडे, रोहन पाटील, साहिल सिंग, भरत जाधव, रौनक वायले, सिद्धांत पाटील, आरुष हरदास, कल्पेश पाटील, 17 वर्षे वयोगट मुली नुपूर गवळी, सोहनी सिंग, सृष्टी सूर्ती, वान्या राव, विणा ठाकरे, जुई पारसी, अक्षरा भंडारी, 19 वर्ष वयोगट मुली दिव्या शिसवे, श्रद्धा सिंग,भूमिका फुलपगारे,19 वर्षे वयोगट मुले विनीत चव्हाण, पारस कुशवाह, अनिरुद्ध जाधव, अर्णव पवार, अनुरुद्ध जाधव, यांची निवड करण्यात आली .

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading