आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत ठाण्यातील इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं मिळवला ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म

फ्रान्समध्ये २२ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या ३६व्या कप्पेल्ले ला ग्रँड आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत ठाण्यातील इंटरनॅशनल मास्टर नुबैरशाह शेखनं ग्रँडमास्टर होण्यासाठी लागणारा दुसरा नॉर्म मिळवला. या स्पर्धेत २२ देशातील ३२२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. १३ ग्रँडमास्टर्स, १९ इंटरनॅशनल मास्टर्स, १८ फिडे मास्टर्स यांचा सहभाग या स्पर्धेचा दर्जा आणि स्तर अतिउच्च पातळीचा असल्याचं दर्शवत होता. नुबैरशाहनं पराजित राहत ४ विजय आणि ५ बरोबरींसह साडेसहा गुण मिळवले. बल्गेरियाचा ग्रँडमास्टर्स एंचेव इवजलो यावर मात केली आणि ग्रँडमास्टरचा २६०० हून अधिक रेटींगच्या कामगिरीचा दुसरा नॉर्म मिळवण्यास पात्र ठरला. या स्पर्धेतून त्याने आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये २२ गुण वाढवले आहेत. ग्रँडमास्टर हा किताब पटकावण्यासाठी ३ ग्रँडमास्टर नॉर्म आणि अडीच हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय रेटींग प्राप्त करावी लागते. पुढील महिन्यात शारजा आणि दुबई येथे होणा-या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत चांगली कामगिरी करून ग्रँडमास्टर होण्यासाठीचा तिसरा आणि अंतिम नॉर्म मिळवण्यासाठी नुबैरशाह कसून सराव करत आहे. त्याच्या रूपाने ठाण्याला पहिला ग्रँडमास्टर लाभणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading