अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना

कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने भररस्त्यात विनयभंगाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनीचा स्कुटी वरून पठलाग करत तिला रस्त्यावर खाली पाडत अत्याचाराचा प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थिनीने आरडा ओरडा करत, गुन्हेगाराच्या भीतीने कोणी वाचवण्यासाठी येत नसल्याचे पाहून स्वतः आरोपीला नख आणि लाता मारत आपला बचाव करत तेथून पळ काढला. आणि घरच्यांसोबत पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला. विशाल गवळी असे या आरोपीचे नाव असून पोलिसांच्या माहिती नुसार आरोपी विशाल हा सराईत गुन्हेगार असून या आधी आरोपीविरोधात बलात्कार, विनंयभंगाचे पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आरोपीवर चोरी आणि लुटीचे देखील गुन्हे दाखल आहेत. विशालला या आधी तडीपार देखील करण्यात आले होते. मात्र, आरोपी एक राजकीय नेत्यांचा नातेवाईक असल्याने या गुन्हातून बिनधास्तपणे सुटून येतो आणि पुन्हा तेच करण्यास सुरुवात करतो. सध्या या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेत पुढचा तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading