अनलॉक-१ – कन्टेन्मेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाकडे

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत. कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली असून रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला जाणार आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन 5 ला ‘अनलॉक 1’ असं नाव देण्यात आलं आहे. कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.
आंतरराज्य मुव्हमेंट वरील निर्बंध हटविण्यात आला आहे.
-स्थानिक उड्डाण आणि मेट्रोच्या आंतरराष्ट्रीय कामकाजाचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल
-हा लॉकडाऊन टप्पा 30 जूनपर्यंत सुरू राहणार आहे
-जुलै महिन्यातील परिस्थितीनुसार स्कूल सिनेमा हॉलचा निर्णय घेण्यात येईल
– रात्री 9 ते सकाळी 5 या वेळेत लोकांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात येणार आहे.
लॉकडाऊन 5.0 ता कालावधी 1 जून ते 30 जून असा असेल. कंटेनमेंट झोनमधील फेजनुसार सूट दिली जाणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading