ठाणे महापालिकेचे उप करनिरिक्षक रमेश दळवी यांचे कोव्हिड १९ आजाराने निधन

ठाणे महापालिकेचे उप करनिरिक्षक रमेश दळवी यांचे कोव्हिड १९ आजाराने निधन झाले. ते खाजगी हॉस्पिटलमधे उपचार घेत होते. दळवी हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा मृत्यू हॉस्पिटल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा युनियनचा आरोप आहे. ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना कोव्हिडशी संबंधित काम न देण्याचा राज्य शासनाचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून पायदळी तुडवला जात असून ५५ वर्षांवरील कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला असल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading