अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि फेरिवाल्यांकडून काही अधिका-यांना 3 करोड रूपयांचा हप्ता पोहचत असल्याचा विक्रांत चव्हाणांचा आरोप

अनधिकृत बांधकाम व्यावसायिक आणि फेरिवाल्यांकडून काही अधिका-यांना 3 करोड रूपयांचा हप्ता पोहचत असल्याचा आरोप शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आज केला. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेउन काँग्रेसने या बांधकामांविरोधात आणि या बांधकामांना अभय देणा-या सर्वच घटकांविरोधात एल्गार पुकारला असून उद्यापासून याची सुरूवात होणार असल्याची माहिती चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. खरेतर नवीन आयुक्तांकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु काही अधिकारी आणि बांधकाम माफीयाच्या संगमताने हि बांधकामे सुरूच असून अनधिकृत बांधकाम आणि फेरिवाल्याकडून काही अधिका-यांना 3 करोड रूपयाचा हप्ता पोहचत असून त्याची सी.आय्.डी. चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे यांचे एक रॅकेट असून आता काँग्रेसचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करून विरोध करतील त्याची सुरूवात उद्यापासूनच करण्यात येणार असून दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. क्लस्टर बाबतही कोणतीही सुसूत्रता अजूनही येत नसून यामध्ये पारदर्शकता येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. क्लस्टरला आमचा विरोध नसून सर्वाना विश्वासात घेउन ही योजना राबवावी असे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. ठाणे शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामाना महापालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्या कृपाशिर्वादानेच हि बांधकामं होत असल्याचे मनोज प्रधान यांनी सांगितले. अधिका-यांकडून आयुक्तांना याबाबत पूर्ण माहिती दिली जात नसून क्लस्टरबाबत आजही नागरिकांमध्ये संभ्रम असून तो दूर होणे गरजेचे असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading