अनधिकृत बांधकामाविरोधात काँग्रेसची दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर निदर्शनं

कोरोना कालावधीत सर्वत्र लॉकडाउन असताना दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे परिसरात अनधिकृत बांधकामे झालीच कशी? असा सवाल करित ठाणे शहर काँग्रेसच्या पदाधिका-यांनी जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही पदाधिकारी सहभागी झाले होते. अनधिकृत बांधकाम आणि फेरिवाला यांच्याकडून दरमहा 3 कोटीचा हप्ता एका अधिका-याला जातो असा आरोप कालच्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी केला आणि सी.आय.डी चौकशीची मागणीही केली होती. आज याच धर्तीवर काँग्रेस कार्यकर्त्यानी दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने केली आणि सर्व अनधिकृत बांधकामे त्वरित हटविण्यात यावी अशी मागणी केली. अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांच्या संगमतानेच दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे कोविड सारख्या परिस्थितीचा फायदा घेऊन करण्यात आली असल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला. महिन्याला 60 हजार पगार घेणारा महापलिकेचा कर्मचारी कोट्यावधी रुपयाची माया कशी जमवू शकतो?असे अनधिकृत बांधकाम,फेरीवाला अशा विविध मार्गाने हि माया जमविली जात असून हा अधिकारी वर्षानुवर्षे एकाच जागी नियुक्त असून याच अधिका-याकडे जवळ जवळ 3 कोटीचा हप्ता दरमहा पोचविला जात असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी यावेळी केला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading