अनधिकृत बांधकामांचं थेट प्रक्षेपण पालिकेसमोर करण्याचा ठाणे युवक काँग्रेसचा इशारा

मुंब्रा-दिव्यामधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेनं कारवाई न केल्यास अशा अनधिकृत बांधकामांचं थेट प्रक्षेपण पालिकेसमोर करण्याचा इशारा ठाणे युवक काँग्रेसनं दिला आहे. मुंब्रा आणि दिवा विभागात २०० पेक्षा जास्त अनधिकृत बांधकामं आहेत. मुंब्रा प्रभाग समिती आणि दिवा प्रभाग समिती मध्ये जे रिजर्व प्लॉट आणी डी पी रस्त्याची जागा आहे, त्यावर खुल्ले आम अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहे, फक्त दिवा प्रभाग समिती हद्दी मध्ये २०० पेक्षा जास्त अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहेत , ते त्वरित जमीनदोस्त करून बिल्डरवरती एम.आर.टी.पी. अंतर्गत कारवाई करण्याबाबत आज ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना तक्रार अर्ज दिला आहे, या बाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी त्यांनी विनंती केली आहे, आणि जर यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर ते महापालिका मुख्यालयासमोर प्रोजेक्टर लावून मुंब्रा दिवा प्रभागसामिती परिसरातील अनधिकृत बांधकामचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याचा इशारा काँग्रेसचे युवा सेना नेते सलमान रिजवी यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading