मी हिंदू स्त्री म्हणून जन्माला आले आणि हिंदू स्त्री म्हणूनच मरणार – चित्रपटगृहात महिलांनी घेतली शपथ

सखल हिंदू समाज ठाणे जिल्ह्याच्या वतीने तसेच अॅडवोकेट धनंजय सिसोदिया यांच्या वतीने ठाण्यातील गोल्ड सिनेमा या चित्रपटगृहात महिलांना ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मोफत दाखवण्यात आला. या चित्रपटादरम्यान माजी खासदार संजीव नाईक, भाजपा संघटक विलास साठे, एडवोकेट धनंजय सिसोदिया अमित सिंग यांच्यासह सकल हिंदू समाज ठाणे जिल्ह्याचे पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘लव जिहाद’ वर आधारित ‘द केरला स्टोरी’ चित्रपट ठाण्यात प्रदर्शित होताच अनेक ठिकाणी हाऊस फुल शो पाहायला मिळाले. यादरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि महिलांनी हा सिनेमा पाहता यावा या करीता ‘रुद्र प्रतिष्ठान’ तसेच जय फाउंडेशन यांच्या संस्थापकीय अध्यक्ष धनंजय सिंह सिसोदिया यांच्या वतीने हा सिनेमा विनामूल्य प्रदर्शित करण्यात आला. या दरम्यान महिलांनी मी हिंदू स्त्री म्हणून जन्माला आले आणि हिंदू स्त्री म्हणूनच मरणार अशी शपथ घेतली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading