अंबरनाथ नगरपरिषदेकडून स्वच्छ भारत अभियानासाठी रोहित भोरे यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती

अंबरनाथ नगरपरिषदेकडून स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येत असून यासाठी रोहित भोरे यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती झाली आहे. भोरे हे अंबरनाथ शहरातील नामांकित व्यक्तिमत्व असून अंबरनाथ शहरात क्रीडा, आरोग्य, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती तसेच युवा विकास या क्षेत्रात कार्य करीत आहेत. तसेच विशेष म्हणजे महिला आणि मुली आणि महानगरपालिकेचे कंत्राटी स्वच्छता दूत/ स्वयंसेवक आणि दारिद्र्य रेषेखालील असलेल्या भटक्या/जनताती मधील समाजाला शिक्षण, कला, क्रीडा सारखे नवयुवा पिढीसाठी प्रोत्साहन शिबिरे घेतली आहेत. याच बरोबर भोरे हे कराटेचे प्रशिक्षक असून यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् या सारखे अनेक विश्व् विक्रम नोंदवून देशाचे नाव उंचावले आहे. शहराच्या विविध घटकांवर नागरिकांना लोकशिक्षण देऊन जनजागृती करणे इत्यादी सामाजिक कार्यकरीता अंबरनाथ नगरपरिषदेच्या “ब्रँड अँबॅसिडर” पदी रोहित भोरे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading