अंगणवाडी कर्मचा-यांना २०१९ पासूनचं मानधन मिळणार

अंगणवाडी कर्मचा-यांना २०१९ पासूनचं मानधन एका आठवड्यात आणि नंतर लगेचच जानेवारीचं मानधन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहा महिन्यांची थकीत मानधन वाढीची रक्कमही देण्याचं आश्वासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांनी दिलं आहे. अंगणवाडी कर्मचा-यांनी नोव्हेंबर २०१९ पासून मानधन न मिळाल्यामुळं एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयावर टाळनाद मोर्चा काढला होता. त्यावेळी अंगणवाडी कर्मचा-यांचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं होतं. यावेळी त्यांना मागण्यांचं एक निवेदनही देण्यात आलं होतं. त्यातील काही मागण्या आयुक्तांनी मान्य केल्या आहेत. रिक्त पदं ताबडतोब भरणं, पात्र मदतनीसांना अंगणवाडी सेविकांच्या पदावर पदोन्नती देणं, मोबाईल रिचार्जचे वर्षाचे पैसे एकाचवेळी देणं तसंच अंगणवाडी कर्मचा-यांमधून मुख्य सेविकांची ५० टक्के रिक्त पदं भरण्याचे आदेशही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading