स्वच्छ ठाणे – सुंदर ठाणे हा संदेश देत ३०० बाईकर्सचा स्वच्छता रॅलीत उत्स्फुर्त सहभाग

शहराला स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या स्वच्छता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून देण्यासाठी स्वच्छ ठाणे – सुंदर ठाणे हा संदेश देत ३०० बाईक रायडर्ससह ठाण्यातील नागरिकांनी स्वच्छता रॅलीत उत्स्फुर्त सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेची जनजागृती करण्याकरिता या दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ही स्पर्धा देशामध्ये सुरू झाली आहे. ठाणे शहरही या स्पर्धेत सहभागी झालं आहे. स्वच्छ ठाणे-सुंदर ठाणे बनवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून शहराला देशातील पहिलं स्वच्छ शहर म्हणून बहुमान मिळवून द्यावा असं आवाहन या जनजागृतीपर रॅलीतून करण्यात आलं. यावेळी शहराला स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी ठाणेकरांनी शपथ घेतली. या दुचाकी रॅलीत फास्टेस्ट बाईक रायडर नितीन कोळी आणि शिल्पा बालकृष्णन् यांनी सर्वांना स्वच्छतेचे संदेश दिले. रहेजा गार्डन पासून सुरू झालेली ही रॅली बाळकूम अग्निशमन केंद्राजवळ विसर्जित झाली. रॅलीतील सर्व सहभागी दुचाकीस्वारांना ठाणे महापालिकेच्या वतीनं प्रशस्तीपत्रक देण्यात आलं.

Leave a Comment

%d bloggers like this: