वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पायावरून वेगाने कार चालवत नेल्याची घटना

कासारवडवली परिसरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पायावरून वेगाने कार चालवत नेल्याची घटना घडली आहे. महादेव हजारे असे या वाहतूक पोलिसाचे नाव असून या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. घोडबंदर रोडवरील नागला बंदर सिग्नलवर हजारे हे वाहतूक नियमन करीत होते. यावेळी एका पांढ-या रंगाच्या  इंडिका कार चालकाला त्यांनी हात देऊन थांबण्याचा इशारा केला. पण त्या कार चालकाने त्यांना न जुमानता वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत, सिग्नल जम्प करून उल्लंघन केले. इतकेच नव्हे तर हजारे यांच्या डाव्या पायाच्या पंजावरून भरधाव वेगात कार चालवत नेली. या अपघातानंतर कार चालकाने जखमी वाहतूक पोलिसाला कोणतीही वैद्यकीय मदत न करता तिथून भरधाव वेगात पळ काढला. यात हजारे यांच्या डाव्या पायला गंभीर दुखापत झाली असून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसालाच अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कासरवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस या कार चालकचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: