रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक

रेल्वे भरती प्रकरणात आत्तापर्यंत ५९ उमेदवारांची फसवणूक झाली असून या उमेदवारांकडून १ कोटी रूपये उकळण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे. रेल्वेच्या ठेकेदारानंच हा प्रकार केला आहे. प्रत्येक उमेदवाराकडून जवळपास २ लाख रूपये नोकर भरतीसाठी घेण्यात आले होते. ठाणे पोलीस अवैध हत्यार प्रकरणात तपास करत असताना हा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोघांपैकी १ जण बोगस रेल्वे भरती करत असल्याचं निष्पन्न झालं होतं. ज्या लोकांना नोकरी मिळाली नाही त्यांनी पैशासाठी ठेका लावल्यामुळे या रेल्वे ठेकेदारानं रिव्हॉल्व्हर मिळवली होती. पैसे मागणा-यांना तो रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत असे. आत्तापर्यंत या ठेकेदारानं ५९ उमेदवारांची फसवणूक केली असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. पोलीसांनी याप्रकरणी रेल्वेचा ठेकेदार राकेश साळुंखे आणि नितीन पगारे अशा दोघांना अटक केली होती. साळुंखेनं या उमेदवारांना फसवण्यासाठी बोगस परीक्षा, बोगस हॉल तिकिट, उमेदवारांना दिली होती.

Leave a Comment

%d bloggers like this: