accident

रामचंद्रनगर येथे रस्ता खचल्यानं ४ गाड्या खड्ड्यात

ठाण्यातील रामचंद्रनगर येथे काल रात्रीच्या सुमारास रस्ता खचल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात या रस्त्यावर उभी असलेली चार वाहनं पडली. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही. रात्रीच्या वेळी या गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळं गाडीत कोणीही नव्हतं. रामचंद्रनगर जवळील कामगार हॉस्पीटल परिसरात रस्त्याचा एक भाग अचानक खचला. अचानक रस्ता खचल्यामुळे साधारणत: १० फूट खड्डा तयार झाला. या रस्त्याच्या पदपथाजवळ एका इमारतीचं काम सुरू आहे. या इमारतीसाठी खोदल्यामुळे रस्ता खचल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या खड्ड्यामध्ये मारूती सुझुकी इर्टीगा, मारूती वॅगन आर, आल्टो आणि एक रिक्षा पडली. रात्रीच्या वेळी ही घटना झाल्यामुळे सुदैवानं कोणतीही जिवितहानी झाली नाही. अन्यथा गंभीर प्रसंग निर्माण झाला असता.

Comment here