मोदी हेच शाश्वत विकासाचे खरे मॉडेल – आशिष शेलार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक निश्चय करून दृढ निश्चयानं भ्रष्टाचारमुक्त शाश्वत राजकारण प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं आहे. त्यामुळेच मोदी हेच शाश्वत विकासाचे खरे मॉडेल असल्याचं मत भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाण्यात व्यक्त केले. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प गुंफताना विकासनिती या विषयावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. आर्थिक स्थिती, मनुष्यबळ, नैसर्गिक स्थिती यावर विकासनिती अवलंबून असते. यापूर्वी सोने खरेदीवर कोणतंही बंधन नव्हतं त्यामुळं लाखो रूपयांचं सोनं खरेदी केलं जायचं, सोन्याची तस्करी व्हायची, पण आता २ लाखांच्या सोने खरेदीवर पॅनकार्ड जमा करणे बंधनकारक झाल्यानं काळ्या पैशाचा व्यवहार सहजतेनं होण्यावर बंधन आलं आहे. पैशांची देवाणघेवाण करताना पॅनकार्ड घेऊन जावं लागत असल्यानं वाहक, चालक, मालक हा बँकेत नाव पत्त्यासहीत आला. नोटबंदीमुळे कर भरणा-यांची संख्या ४० ते ४५ टक्क्याने वाढली. गेल्या ४ वर्षात सौरउर्जेचा उपयोग १४ गेगावॅटवरून ४० गेगावॅटवर गेला आहे. जलवाहतुकीमुळे निसर्गाचा ऱ्हास कमी होईल. पेट्रोलियम प्रोडक्टसचा वापर कमी झाला तर परकीय चलन वाचेल. रूपया डॉलरच्या बरोबरीला येईल. अशाप्रकारे विकासाचा शाश्वत चेहरा गेल्या ४ वर्षात पुढे जात असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading