ठाणे महापालिकेनं कोट्यावधी रूपये खर्च करून बांधलेले रस्ते नेमके कोणासाठी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खाजगी तसंच पर्यटन कंपन्यांची वाहनं उभी करून ठेवलेली पहायला मिळतात. ठाणे पूर्वला महापालिकेनं विसर्जन घाटाकडे जाण्यासाठी रस्ता बांधला आहे. मात्र या रस्त्यावर अनेकदा वाहनं उभी करून ठेवलेली आढळतात. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांऐवजी बाहेरचीच वाहनं या ठिकाणी उभी करून ठेवलेली पहायला मिळतात. यामध्ये पर्यटन कंपन्यांच्या गाड्यांचाच भरणा दिसतो. यावर त्वरीत कारवाई करावी अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.