TMC

महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीनं शहरातील सर्व शालेय क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण

शालेय क्रीडा स्पर्धेच्या वेळी क्रीडा शिक्षकांची धावपळ होऊ नये तसंच स्पर्धा नोंदणी प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण व्हावी याकरिता महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या वतीनं शहरातील सर्व शालेय क्रीडा शिक्षकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. क्रीडा विभागाच्या वतीनं या वर्षात सहावी ते बारावी या वर्गातील १४, १७ आणि १९ वयोगटात खेळण्याच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेत महापालिका क्षेत्रातील अडीचशे ते तीनशे शाळा सहभागी होतात. या स्पर्धेकरिता सहभागी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्यात येणार असून हे ऑनलाईन अर्ज कसे भरावे, कोणती माहिती भरणं अनिवार्य आहे याचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना देण्यात आले. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळं नोंदणी प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण होऊन क्रीडा शिक्षकांचा वेळही वाचणार आहे.

Comment here