मतदार याद्या आधारशी संलग्न करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी

सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वैधतेला मान्यता दिली असल्यानं आता मतदार याद्याही आधारशी संलग्न कराव्यात जेणेकरून मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात आणणे सोपे होईल अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. युपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आलेल्या आधार कार्डाच्या वैधतेवर शिक्कामोर्तब झालं आहे. आधार हा सामान्यांचा अधिकार व्हावा असं वाटत असेल तर आधार आणि मतदारयाद्या संलग्न करणं गरजेचं आहे. त्यामुळं मतदार याद्यांमधील घोळ संपणे सोपे होणार आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. कागदपत्रांची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे त्यामुळं मतदार यादीमध्ये नाव नोंदण्यासाठी अनेक जण टाळाटाळ करत असतात. वर्ग अर्धवट सोडून मतदान प्रक्रियेचं काम शिक्षकांना करावं लागतं. आधार आणि मतदार याद्या या संलग्न केल्या तर मतदार संख्या आणि मतदान यांची सांगड घालणं निवडणूक आयोगाला सोपं होणार आहे. बोगस मतदानही यामुळं रोखता येणार आहे. मतदान प्रक्रिया सुलभ होण्याबरोबरच निवडणूक आयोगाचं कामही सोपं होणार असल्यानं मतदार याद्या आधारशी संलग्न कराव्यात अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: