भिवंडीच्या उपविभागीय अधिका-यांचे स्टेनो सुनिल कांबळे यांना १४ लाखांची लाच स्वीकारण्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आलं आहे. या प्रकरणातील तक्रारदारांच्या जमिनीच्या अपिल केसचा निकाल त्यांच्या बाजूनं देण्याकरिता सुनिल कांबळे यांनी १५ लाखांची मागणी केली होती. तक्रारदारांकडे एवढे पैसे नसल्यामुळं अखेर १४ लाख रूपये देण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानुसार भिवंडी उपविभागीय कार्यालयामध्ये हे पैसे स्वीकारताना सुनिल कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. तक्रारदारांकडे पैसे नसल्यामुळं या १४ लाखांमध्ये साडेतेरा लाखांच्या खेळण्यातील नोटा होत्या. कांबळे यांनी हे पैसे प्रांत अधिका-यांच्यासाठी स्वीकारले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कांबळे यांना अटक केली आहे.
