पाचपाखाडी परिसरातील सेवा रस्त्यावर असणा-या हनुमान मंदिरासमोर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या वाहनांना आग लावल्याप्रकरणी दोन युवकांना नौपाडा पोलीसांनी अवघ्या २४ तासात जेरबंद केलं आहे. काल पहाटे सेवा रस्त्यावरील ९ दुचाक्या जाळण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीसांनी स्वतंत्र पथकं तयार केली होती. त्या पथकांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून २४ तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला आहे आणि या प्रकरणी गणेशवाडीत राहणा-या विजय जोशी आणि अनिकेत जाधव या दोघांना अटक केली आहे.
