नौपाडा परिसरात भर दुपारी महिलेचे स्त्रीधन हिसकावून धूम ठोकल्याची घटना

नौपाड्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी दुचाकीस्वार चोरट्यांनी कृषी विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी महिलेचे स्त्रीधन हिसकावून धूम ठोकल्याची घटना घडली. नवरात्रीतच सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची माळ हिसकावल्याने महिला वर्गामध्ये घबराट पसरली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नौपाडा, गावंड पथ येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिला वागळे इस्टेट येथील कृषी भवनमध्ये सहाय्यक लेखा अधिकारी आहेत. बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्या महात्मा गांधी रस्त्यावरून भास्कर कॉलनी येथे पायी येत होत्या. तेव्हा हेल्मेटधारी दुचाकीस्वारासह पाठीमागे तोंडाला रुमाल बांधून बसलेल्या चोरट्यानी त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 60 हजारांची सोन्याची माळ हिसकावून एमटीएनएल चौकाच्या दिशेने धूम ठोकली. 18 ते 25 वयोगटातील या दोन्ही चोरट्यांनी निळ्या रंगाची जीन्स घातली होती. नौपाडा पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: