निविदा निघाली नसतानाही कोणत्या आधारावर कल्याण मेट्रोचं भूमीपूजन – आमदार जितेंद्र आव्हाडांचा प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या कल्याण मेट्रोचं भूमीपूजन होत असून या प्रकल्पासाठी अद्याप निविदाही निघाली नसताना पंतप्रधान कोणत्या आधारावर हे भूमीपूजन करत आहेत असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. हा प्रकल्प फायद्यापेक्षा नुकसानीचाच असल्याची माहिती देण्यासाठी बोलवलेल्या पत्रकार परिषदेत आव्हाड यांनी हा आरोप केला. हे भूमीपूजन म्हणजे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी आहे. काल्हेर-भिवंडीची लोकसंख्या आणि कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवलीची लोकसंख्या यांचा तुलनात्मक अभ्यास करून हा प्रकल्प कापुरबावडी मार्गे कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली असा न्यायला हवा होता. पण केवळ भारतीय जनता पक्षाच्या खासदाराच्या क्षेत्रात मतांच्या राजकारणासाठी ही मेट्रो फिरवण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची निविदा नाही त्याचा सखोल अभ्यास नाही अशा त्रुटी असतानाही पंतप्रधान जर भूमीपूजन करत असतील तर तो मतदारांचा अपमानच आहे. निवडणुकीचं राजकारण करण्यासाठी हे भूमीपूजन केलं जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 

Leave a Comment

%d bloggers like this: