दुर्मिळ अशा खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून विक्री करण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला अटक

नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ अशा खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करून ती विक्री करण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या त्रिकुटाला कोट्यावधी किंमतीच्या मुद्देमालासह गुन्हे शाखेनं पकडलं आहे. खारेगाव येथील अमित गार्डन हॉटेलजवळ या त्रिकुटाला पकडण्यात आलं. काशीनाथ पवार, दिलीप बिर्जे, ज्ञानेश्वर मोरे अशा तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २० लाख रूपये किंमतीचे खवले मांजर, त्याच्या शरीरावरील लहान मोठे आकाराचे ६ किलो खवले हे काशीनाथ पवारकडे तर २० कोटी रूपयांची व्हेल माशाची उलटी हे दिलीप बिर्जेकडे आढळले. या खवले मांजर आणि व्हेल माशाच्या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधीची किंमत आहे. व्हेल माशाच्या उलटीच्या दगडाचा ल्युब्रीकन्ट आणि सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी उपयोग होतो. हे तिघे या वस्तू कोणाला विकण्यासाठी आले होते याचा तपास पोलीस करत असल्याचं एका पत्रकार परिषदेत दीपक देवराज यांनी सांगितलं.

Leave a Comment

%d bloggers like this: