ठाण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेचा सक्रीय सहभाग आवश्यक – संजय केळकरांची अपेक्षा

ठाण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेनंही सक्रीय प्रतिसाद द्यायला हवा अशी अपेक्षा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यातील विविध वाहतूक समस्यांसंदर्भात काल वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत केळकर यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. कोपरी भागातील अवैध वाहतुकीवर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोपरी येथे पोलीसांसाठी एक चौकी उभारण्याबरोबरच क्लोज सर्किट कॅमेरेही लावले जाणार आहेत. महर्षी कर्वे रोड, आगासकर मार्ग येथेही आता कालमर्यादित पार्कींगची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सकारात्मक बदल केले जाणार असून अनधिकृत रिक्षा स्टँडवर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वॉर्डनही नेमले जाणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

Leave a Comment

%d bloggers like this: