ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेला साडेतीनशे मल्लांची उपस्थिती

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय महापौर चषक कुस्ती स्पर्धेत साडेतीनशे मल्लांची विक्रमी नोंद झाली आहे. महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते कुस्ती लावून या स्पर्धेचा शुभारंभ झाला. महापौर चषक कुस्ती स्पर्धेसाठी जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील मल्लांनी हजेरी लावली आहे. कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडणा-या एकापेक्षा एक कुस्त्या मानपाडा येथील मैदानात सुरू आहेत. महापौर केसरी विजयी मल्लास १ लाख रूपये आणि चांदीची गदा प्रदान केली जाणार आहे. पुरूष, महिला आणि कुमार गटात या स्पर्धा सुरू आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: