गावठाणच्या सीमांकनाशिवाय क्लस्टर नाही – राष्ट्रवादीची भूमिका

सीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊच शकत नाही ही राष्ट्रवादीची भूमिका असून आम्ही सीमांकन झाल्याशिवाय क्लस्टर होऊ देणार नाही. पण शिवसेना सत्ताधारी असून त्यांनी ही भूमिका नाकारली तर घात होऊ शकतो म्हणून आगरी-कोळी नेत्यांनी शिवसेनेवर दबाव आणावा आम्ही तुम्ही बोलवाल तेव्हा उपस्थित राहू आणि तुमचं नेतृत्व स्वीकारू, लढ्यात सहभागी होऊ असं आश्वासन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं त्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला त्यावेळी आव्हाड यांनी हे आश्वासन दिलं. राष्ट्रवादीनं जोपर्यंत गावठाणांचे सीमांकन केलं जात नाही तोपर्यंत क्लस्टरला मंजुरी देऊ नये अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आधी सीमांकन निश्चित करू आणि नंतर एसआरए पुढे घेऊन जाऊ असं आश्वासन विधानसभेत दिलं होतं पण अद्याप त्याची अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून द्यावी लागेल असंही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: