गरजू रूग्णांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

गोरगरिब आणि गरजू रूग्णांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यात येणार असून त्याचे लोकार्पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल झालं. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना सध्या नष्ट होत असून सध्याचे उपचार सर्वसामान्यांना परवडणारे नसतात. त्यामुळं दैनंदिन जीवनातील आजारांवर तात्काळ आणि विनामूल्य उपचार मिळावेत यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्रीनगर येथील वारलीपाडा आणि कळव्यातील महात्मा फुले झोपडपट्टी येथे या दवाखान्यांची सुरूवात झाली. आता राज्यभरात ही संकल्पना राबवली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. या दवाखान्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप, किरकोळ जखमा, अंगदुखी, जुलाब आदी आजारांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून तरूण-तरूणींना स्वसंरक्षणासाठीचे प्रशिक्षण वर्ग ठिकठिकाणी राबवले जातात. उत्तम मार्शल आर्ट पटू असलेले अभिनेते अक्षयकुमार यांची या उपक्रमास साथ लाभली आहे. काल वर्तकनगर येथील रेमण्ड कंपनीच्या मैदानावर अशाच एका प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. मुली आणि महिलांवरील वाढते अत्याचार रोखायचे असतील तर त्यांनी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी सक्षम बनले पाहिजे. याकरिता लहानपणापासून त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे गिरवले पाहिजेत आणि मुलींऐवजी मुलांवर बचाव म्हणण्याची वेळ आली पाहिजे असं प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading