लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर रमजान महिन्याच्या काळात मुंब्रा-दिव्यात माफीया सक्रीय झाले आहेत. ठाण्यातील दिवा परिसरात आधीच अनधिकृत बांधकामांनी कळस गाठला असतानाच मुंब्र्यातही अनधिकृत बांधकाम बिनबोभाट सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी मध्यंतरी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे निर्देश दिले होते तरीही पालिका अधिका-यांना भूमाफिया जुमानत नसल्याचं दिसत आहे. उलट अधिकारी-कर्मचा-यांना आमिषं दाखवून बांधकामं करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंब्र्यातील रशिद कंपाऊंड भागात अनेक ठिकाणी बेकायदा जोता उभारून बांधकाम सुरू करण्याचे प्रयत्न दिसत आहेत. अनधिकृत इमारती उभारण्यासाठी काही ठिकाणी खड्डे देखील खणले असल्यानं ऐन पावसाळ्यात दुर्घटना होण्याची भीती आहे. दिवा परिसरातील पूर्व-पश्चिम भागातील सावे गाव, टाटा पॉवर, बीजे काँप्लेक्स, मुंब्रादेवी, आगासन रोड, माथार्डी, गणेशनगर, बेडेकरनगर, शीळगाव या परिसरात दीडशेहून अधिक अनधिकृत बांधकामं सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading