बॅटरीचे दुकान फोडून लाखोंची बॅटरी लंपास केली असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.कल्याण कोळशेवाडी येथील चक्की नाका परिसरात एका स्टार बॅटरीच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना सहा तारखेला पहाटेला उघडकीस आली. याबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण दोन- तीन चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळशेवाडी पोलीस तालुक्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष पथक तयार करत सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला असता मुंब्रा डोंगरी परिसरात हे गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचत या तिन्ही आरोपींना 24 तासाच्या आत बेड्या ठोकत या आरोपीकडून 15 लाखापेक्षा अधिक रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार हे तिन्ही आरोपी एक सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबईसह अनेक ठिकाणी मारहाण आणि इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हे दाखल आहेत.
You must be logged in to post a comment.