मुब्रा बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झालं असून आता हा रस्ता वापरण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. हा रस्ता एप्रिल महिन्यापासून कामासाठी बंद करण्यात आला होता. हा रस्ता बंद असल्याने सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. आता हा रस्ता पुन्हा सुरू झाल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.