महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांचा गौरव

महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील चार महिलांना आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येतात. महिलांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्यातील काशीबाई जाधव, शोभा वैराळ, अनिता दळवी आणि सारिका भोईटे पवार यांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, दहा हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच पोलीस आयुक्तालयात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामध्ये लहान मुले घेऊन येणाऱ्या महिला तसेच स्तनदा मातांचा समावेश असतो. या महिलांना त्यांच्या लहान मुलांना खाऊ घालणे आणि स्तनपानासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी या हिरकणी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आरामाची सोय, पाण्याची व्यवस्था, मुलांसाठी खेळणी आदींची सोय करण्यात आली आहे. यापूर्वी पोलीस अधिक्षक कार्यालयातही हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील गर्दीच्या विविध सात ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात येणार आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading