भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं एक साडी आदिवासी भगिनीसाठी अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाच्या वतीनं जव्हार, खोडाळा, मोखाडा येथील आदिवासी पाड्यांवर कपडे वाटले जाणार आहेत. यासाठी वापरता येण्यासारखे चांगले नवे अथवा जुने कपडे द्यावे असं आवाहन मंडळानं केलं आहे. साड्या, अगदी तान्ह्या बाळापासून १५ वर्षापर्यंत मुला-मुलींचे कपडे तसंच पुरूषांचे कपडेही प्रताप व्यायामशाळा, वामनराव ओक रक्तपेढी येथे आणून द्यावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी या वस्तू गोळा केल्या जाणार आहेत. उद्या म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत हे कपडे स्वीकारले जाणार आहेत. या उपक्रमासाठी ऑनलाईन बँकींगद्वारेही रक्कम देता येणार आहे.