बंगळूरु येथे नुकत्याच झालेल्या 18 व्या नॅशनल लाईफसेव्हिंग स्विमींग चॅम्पियनशीप स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनच्या जलतरणपटूंनी यशस्वी कामगिरी करीत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली. स्टारफिश जलतरणपटूंच्या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 19 वर्षाखालील गटात शरवन पेठे या जलतरणपटूने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्यपदक तर मानव मोरे याने 2 सुवर्ण आणि 3 कांस्यपदकं पटकावली. 16 वर्षाखालील गटात स्नेहा लोकरे हिने 3 कांस्य तर कैवल्य राणे याने 1 कांस्यपदक पटकावलं. 14 वर्षाखालील गटात आयुषी आखाडे हिने 2 सुवर्ण, 1 रौप्य, 3 कांस्यपदक, आयुष तावडे याने 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक, 12 वर्षाखालील गटात युवराज राव याने 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि कांस्य तर तृणांश गंद्रे याने 4 सुवर्ण, 1 कांस्यपदक पटकाविले. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरणतलाव येथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करीत आहेत.