एका नाल्यात आज एक तीन वर्षाचं वासरू पडलं होतं. त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. शास्त्रीनगर जवळील नाल्यामध्ये साभा यादव यांचं हे तीन वर्षाचं वासरू पडलं होतं. ही माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं त्वरीत धाव घेतली आणि नाल्यातील वासराची सुटका करून हे वासरू साभा यादव यांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आलं.