ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी संजय भोईर तर परिवहन समिती सभापती पदी विलास जोशी यांची बिनविरोध निवड झाल्यातच जमा आहे. आता या निवडीची औपचारीक घोषणा बाकी आहे. आज स्थायी समिती आणि परिवहन समिती सभापती पदासाठी अर्ज दाखल करायचे होते. आज या पदासाठी शिवसेनेतर्फे संजय भोईर यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी तर परिवहन समिती सभापती पदासाठी विलास जोशी यांनी आपले अर्ज दाखल केले. या दोन्ही समित्यांमध्ये शिवसेनेचं बहुमत असल्यानं शिवसेनेतर्फे दिल्या जाणा-या उमेदवारांची निवड निश्चित होती. पण आज शिवसेनेशिवाय इतर कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळं संजय भोईर यांची स्थायी समिती सभापती म्हणून तर विलास जोशी यांची परिवहन समिती सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे.