जिल्ह्यात आज कोरोनाचे ८८ नवीन रूग्ण आढळले. तर एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यात १ हजार ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात ४७ नवीन रूग्ण आढळले तर सध्या ४८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये ७ नवीन रूग्ण तर ५५ रूग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईमध्ये १५ नवीन रूग्ण तर २८८ रूग्ण उपचाराधीन आहेत. उल्हासनगर मध्ये एकही नवा रूग्ण नाही तर २६ रूग्ण उपचार घेत आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात एकही रूग्ण नाही तर १२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मीरा-भाईंदर मध्ये १४ नवे रूग्ण आढळले तर ८९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये एकही रूग्ण नाही तर ७ रूग्ण उपचाराधीन असून ठाणे ग्रामीण मध्ये ५ नवे रूग्ण आढळले आणि ४९ रूग्ण उपचार घेत आहेत.