ठाण्यातील प्रख्यात कार्डिओ थोरासिस सर्जन आणि गुरूकृपा हॉस्पिटलचे संचालक डॉ. डी. जी. पंडीत यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. सेवाभावी डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटल येथे त्यांनी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केलं होतं. मुंबई सेंट जॉन आणि जे जे हॉस्पिटल येथेही ते काही काळ कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, सूना, नातवंडं असा परिवार आहे.