खोटी बतावणी करून फसवणूक करणा-या एकाला ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रीय असून गेल्या काही दिवसापासून फसवणुकीचे असे अनेक प्रकार घडले होते. एकटे चाललेल्या ज्येष्ठांना लुटण्यात येत असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने तसंच रोकड लुटली जात होती. पोलीस अशा मंडळींच्या मागावर होते. ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अनिल शेट्टीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात घडलेले गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून ३ लाख ४४ हजारांचे दागिने पोलीसांनी हस्तगत केले आहेत.