विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरेंच्या स्मरणार्थ समन्वय प्रतिष्ठान आणि ठाणे जिल्हा जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाऊंडेशनने संघाने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत ६०० हून अधिक जलतरणपटू सहभागी झाले होते. मारोतराव शिंदे तरण तलावामध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केले. या स्पर्धेत गट क्रमांक १ मध्ये स्टारफिशचा मानव मोरे आणि ठाणे क्लबचा वेदांत राजा, स्नेहा लोकरे, गट क्र. २ मध्ये आरआरएसएचा ॲरोन मॅथ्यू , स्टारफिशची सवर आकुस्कर, गट क्र. ३ मध्ये ठाणे क्लबचा जश रायकुंडालीया आणि रोहन आंबुरे, गट क्र. ३ मध्ये आरआरएसएची अन्वेशा सिंग, गट क्र. ४ मध्ये वसंत विहार क्लबचा शंतनु कैचे आणि स्टार फिशची आयुषी आखाडे, गट क्र. ५ मध्ये आरआरएसएचा रुद्र गुप्ता, स्टारफिशची फ्रेया शाह, गट क्र. ६ मध्ये आरआरएसएचा प्रिंस काठवले, ओझोनचा दक्ष शाह, स्टारफिशची माही जांभळे यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले. या विजेत्यांना आमदार निरंजन डावखरे, परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे आदींनी बक्षीसे दिली.