यंदाच्या धुळवडीत उत्साह दिसत नव्हता. यामध्ये कलाकारांचा धुळवड उत्सवही मागे नव्हता. यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळं धुळवडीवर त्याचा मोठा परिणाम जाणवला. ठाण्यातील कलाकार गडकरी रंगायतनच्या आवारात दरवर्षी धुळवड साजरी करतात. यंदा कलाकारांनी वंदना चित्रपटगृहात धुळवड साजरी केली. मात्र या धुळवडीत फारसे कलावंत सहभागी झाल्याचं दिसलं नाही. दिग्दर्शक विजू माने यांनी वंदना चित्रपटगृह चालवायला घेतलं असून प्रथमच या चित्रपटगृहाच्या आवारात धुळवड साजरी करण्यात आली. मराठीतील अनेक कलावंत तर या धुळवडीपासून दूरच होते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत कलाकार मंडळी दरवर्षी ठाण्यात धुळवड साजरी करतात. मात्र यंदा कलाकारांच्या धुळवडीतही उत्साह दिसला नाही. बहुतांश कलाकार हे ठाण्याबाहेरच्या उत्सवांमध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात आलं. कलाकारांच्या या धुळवडीचे हे २३वं वर्ष होतं.