होळी-धुळवडीवर कोरोनाचं सावट – त्यामुळे यंदा फारसा प्रतिसाद नाही


ठाण्यामध्ये होळीपाठोपाठ धुळवडही साजरी करण्यात आली. माञ यामध्ये म्हणावा तसा उत्साह नव्हता. यंदाच्या धुळवडीवर चीनमधील कोरोना व्हायरसचं सावट होतं त्यामुळं बहुतांश धुळवडीचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. पण वैयक्तीक आणी गटागटाने धुळवड साजरी केली जात होती. पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त होता. यंदा पोलीसांनी रस्त्यावर डीजे लावायला परवानगी नाकारली होती. त्यामुळं अगदी काही ठिकाणं वगळता सर्वत्र धुळवड ही वैयक्तीकरित्या साजरी होताना दिसत होती. युवक-युवती टोळक्यांनी अथवा एक दोनच्या गटानं रस्त्यावर दिसत होते. सर्वसाधारण रस्त्यावर अथवा विविध गृहसंकुलांमध्ये यंदा धुळवड साजरी होताना दिसली. धुळवड असल्यामुळं सकाळपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. नेहमी वर्दळीनं गजबजलेल्या रस्त्यांवर अगदी तुरळक वाहनं दिसत होती. धुळवड साजरी करणारे रस्त्यांवरून जा-ये करणा-यांच्या अंगावर रंग उडवत नव्हते. मात्र मोठ्या प्रमाणात आवाहन करूनही पाण्याचा वापर धुळवड साजरी करताना होत होता. विविध निर्बंध, पर्यावरण रक्षण, जनजागरण आणि कोरोनाचं सावट अशा विविध बाबींमुळे यंदाच्या धुळवडीत फारसा जल्लोष कुठेच दिसला नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading