ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त गरीब कुटुंबांना मदतीचा हात

ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. पालघर जिल्ह्यातील पिंजाळपाडा, माऊली किल्ल्याजवळील जुना वना पाडा येथील आदिवासी कुटुंबातील नागरिकांना दिवाळीनिमित्त कपडे आणि धान्याचे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या नागरिकांना मदत मिळावी याकरिता जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं मदतीचं आवाहन केलं जातं आणि ही मदत नागरिकांच्या दारात नेऊन दिली जाते. यावर्षी या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. गरीब कुटुंबांकरिता कपडे, डाळ, साखर, घरगुती भांडी अशी मोठी मदत संस्थेकडे आली. या मदतीमुळे या गरीब कुटुंबांच्या चेह-यावर हास्याची लकेर उमटली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading