मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आदिवासींचं आंदोलन मागे

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर वन जमिनीचे हक्क मिळावेत या मागणीसाठी आदिवासींनी पुकारलेलं आंदोलन मागे घेतलं आहे. हजारो आदिवासींनी या मागणीसाठी ठाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं. पाणी पुरवठा, अखंडीत वीज पुरवठा, वन जमिनीवर शेती करण्याचा हक्क, उत्तम आरोग्य सेवा आणि मुलांसाठी शिक्षण अशा विविध मागण्यांसाठी आदिवासींनी हे आंदोलन केलं. दिवसभर चाललेल्या या आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला बोलवून त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी वन जमिनीवरील आदिवासींचा हक्क सुरक्षित ठेवला जाईल असं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर या वर्षअखेरपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे. पाणी पुरवठ्याच्या टंचाईबद्दल अधिका-याची नियुक्ती करून आढावा घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलं. मध्य प्रदेशाप्रमाणे ज्येष्ठ आदिवासी नागरिकांना निवृत्ती वेतन मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Comment

%d bloggers like this: