ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. गेले काही दिवस महापालिका प्रशासनाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आयुक्त सातत्यानं यासंदर्भात बैठका घेऊन वसुलीचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आज एक बैठक घेऊन वसुलीच्या वाढीसाठी कठोर प्रयत्न करण्याबरोबरच यावर्षी डिसेंबरपासूनच महापालिकेची सर्व प्रभाग समित्यांची कार्यालयं आणि मुख्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी वसुलीसाठी दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत महापालिकेची कार्यालयं सुट्टीच्या दिवशी सुरू असत. पण यावर्षीपासून विशेष वसुलीसाठी महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासूनच सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: