बाळकूम येथे रंगकामासाठी उभारण्यात आलेली परांची तुटल्यामुळे ७ कामगार जखमी झाले आहेत. बाळकूम येथील रूणवाल गार्डन सिटी मध्ये साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. रूणवाल गार्डन सिटी येथे रंगकामासाठी परांची दोन वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. या ठिकाणी १८ मजली इमारत असून २ वर्षापूर्वी बांधण्यात आलेली ही परांची कोसळून ७ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या परांचीनं जवळपास २ पावसाळे पाहिल्यामुळे परांची कमजोर झाली होती. आज सकाळी जवळपास १२ कामगार या ठिकाणी काम करत होते. यापैकी काही कामगार हे खालीच काम करत होते. परांची चढून वर गेलेले कामगार अचानक परांची कोसळल्यामुळे उंचावर पडल्यानं गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी महम्मद शेख, महम्मद रॉयल शेख, हसन अली शेख, मनिरूद्दीन शेख आणि जमाल शेख यांना हायलँड रूग्णालयामध्ये दाखल करण्यात करण्यात आलं आहे. तर इफ्तियार महम्मद आणि दुलाल सिंग अशा दोन कामगारांना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
