दिवाळी पहाट कार्यक्रमात पोलीसांनी धरला ठेका – तर पोलीस आयुक्तांनीही सादर केलं गाणं

पोलीसांना कोणतेच सण साजरे करता येत नाहीत. सणासुदीला पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करून पोलीसांना सुरक्षेसाठी तैनात केलं जातं. आपले सण सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडले जावे यासाठी पोलीसांना नेहमीच्या सणांना मुकावं लागतं. यासाठी ईनरव्हील क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटीतर्फे पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवाळी पहाट कार्यक्रमात हिंदी आणि मराठी गाणी सादर करण्यात आली. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दिवाळी पहाटमध्ये सहभागी होत दिवाळीचा आनंद लुटला. सैराटच्या गाण्यावर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांनीही जोरदार ताल धरला होता.

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकरही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनीही गाणं सादर करून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.

Leave a Comment

%d bloggers like this: