ठाण्यातील पहिल्या श्रीस्थानक वाहिनीचं सहाव्या वर्षात पदार्पण

ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी असलेल्या श्रीस्थानिक वाहीनीने आज सहाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. ठाणे वार्तानं ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचं प्रसारण व्हावं, स्थानिक कलाकारांना संधी मिळावी या उद्देशानं श्रीस्थानक वाहिनी ही १ नोव्हेंबर २०१३ ला धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सुरू केली. आज या वाहिनीला ५ वर्ष पूर्ण झाली आहेत. सुमारे १ हजार वर्षापूर्वी शिलाहार राजांची राजधानी असलेल्या पूर्वीच्या श्रीस्थानकाचा अपभ्रंश होत सध्याचं ठाणे हे नाव आल्याचं इतिहासकारांकडून सांगितलं जातं. ठाण्याचं हे ऐतिहासिक नाव घेऊन श्रीस्थानक वाहिनी सुरू करण्यात आली. सध्या इन केबलच्या ८२७ क्रमांकावर श्रीस्थानक वाहिनीचं दिवसभर प्रक्षेपण सुरू असतं. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा हिंदी चित्रपट न दाखवता स्थानिक कार्यक्रमांचं प्रक्षेपण गेली ५ वर्ष केलं जात आहे. अशाप्रकारे प्रक्षेपण करणारी ही एकमेव वाहिनी आहे. श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंगही होत असून ठाणे वार्ता डॉट ईन या संकेतस्थळावर लाईव्ह स्ट्रीम वर क्लीक केल्यास आपण या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद आपल्या संगणकावर अथवा मोबाईलवरही लुटू शकता. स्थानिक पातळीवर गेली ३ वर्ष लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी श्रीस्थानक वाहिनी ही राज्यातली एकमेव वाहिनी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading