उच्च न्यायालयात वकीली करणा-या वकीलास एका अनोळखी भामट्यानं घातला गंडा

उच्च न्यायालयात वकीली करणा-या वकीलास एका अनोळखी भामट्यानं गंडा घातला आहे. ठाण्यातील ढोकाळी येथे राहणारे निखिल पुजारी हे उच्च न्यायालयात वकीली करतात. अचानक त्यांच्या घरी वित्तीय सहाय्य करणा-या कंपनीचा कर्मचारी आला. मोबाईलचे दोन हफ्ते न भरल्यानं तो वसुलीसाठी घरी आला होता. त्यावेळी असा कोणताही मोबाईल खरेदी केला नसल्याचं पुजारी यांनी सांगितले. त्यावर आधार कार्ड आणि पॅनकार्डचे पुरावे वसुली करणा-या कर्मचा-यांनी पुजारी यांना दाखवले. हा मोबाईल फोन टेंभी नाका येथील दुकानातून खरेदी करण्यात आला होता. त्याच्याकडे चौकशी केली असता १३ जूनला अज्ञात भामट्यानं पुजारी यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट आधार, पॅनकार्ड आणि वीजबीलाची मूळ प्रत दाखवून मोबाईल खरेदी केला असल्याचं लक्षात आलं. मोबाईल दुकानदारासह वकीलाची फसवणूक करण्यात आल्यानं या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading